Thu, Jan 24, 2019 16:43होमपेज › Kolhapur › तेरवाडात अधिकार्‍यांना ठेवले डांबून

तेरवाडात अधिकार्‍यांना ठेवले डांबून

Published On: Dec 27 2017 10:01PM | Last Updated: Dec 27 2017 10:03PM

बुकमार्क करा
कुरुंदवाड: प्रतिनिधी

तेरवाड (ता.शिरोळ) पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचा नमुना घेण्यासाठी आले असता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राज कामत, क्षेत्र अधिकारी अविनाश कडले यांना घेराव घालून डांबून ठेवलेल्या ठिकाणी भेट कण्यासाठी आलेल्या तहसिलदार गजानन गुरव यांनाही सायंकाळपर्यंत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून डांबून ठेवले.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना नदीतील प्रदूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न केला असता बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी रोखून धरल्याने प्रदूषित पाणी अधिकाऱ्यांच्या अंगावर ओतले. आंदोलकांचा पाणी पाजण्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखून धरल्याने पोलिस व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी चकमक झाली. 

दरम्यान प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या घटकांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करून  अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांसह तहसीलदार गुरव यांना घेराव घालून सायंकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 5 तासांहून अधिक वेळ डांबून ठेवल्याच्या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.