Fri, Apr 26, 2019 02:07होमपेज › Kolhapur › दहावीच्या विद्यार्थ्यांचा हलगीच्या तालावर जल्लोष...

दहावीच्या विद्यार्थ्यांचा हलगीच्या तालावर जल्लोष...

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 22 2018 10:43PMकोल्हापूर : प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेतील गुरुवारी (दि. 22) आयसीटी विषयाचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात ढोल-ताशांचा गजर व रंगांची उधळण करत एकच जल्लोष केला. 
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा सुरू आहे.  गुरुवारी पेपर सुटल्यानंतर हायस्कूलच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी हलगी, घुमक्याच्या तालावर ठेका धरला. दहावीच्या परीक्षेदरम्यान रंगपंचमी सण होता. काही विद्यार्थ्यांनी राहून गेलेल्या रंगपंचमीचा मित्र-मैत्रिणींना रंग लावून आनंद लुटला.

यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यांवर आनंद दिसून येत होता. ‘महत्त्वाच्या पेपरमधून सुटलो एकदाची,’ अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये होती. काही विद्यार्थ्यांनी मित्रांसमेवत सेल्फी घेत सोशल मीडियावर फोटो शेअर केले. शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर हुल्लडबाजी करणार्‍यांना विद्यार्थ्यांना पोलिसांनी समज दिली. मराठी माध्यमांचे पेपर संपले आहेत. उर्दू व इंग्रजी माध्यमांचे काही पेपर अद्याप शिल्लक असल्याचे विभागीय सचिवांनी सांगितले. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, ten standerd  student examination, last board paper, celebrates on dhol tasha music