Thu, Feb 21, 2019 00:58होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 10 जखमी

कोल्‍हापूर : पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 10 जखमी

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 1:07AMबाजारभोगाव : वार्ताहर

बाजारभोगावसह परिसरात सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने  दहा जणांवर हल्‍ला केला. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. अनुबाई धुमाळ (कसबा बोरगाव), विजया चोपदार (वाळोली), आनंदा पोवार (पोर्ले/बोरगाव), अमोल काटकर, शारदा कांबळे, राजाराम काटकर (पोर्ले), प्रकाश हिर्डेकर (बाजारभोगाव) आदी जखमी झाले. कुत्र्याने बापू तुका भणगे या वृद्धाच्या तोंडाचा, डाव्या दंडाचा, तसेच उजव्या हाताचा कडकडून चावा घेतला. या कुत्र्याने बंडोपंत पाटील यांच्या गोठ्यातील दोन दुभत्या म्हशींचेही लचके तोडले.