Thu, Jan 17, 2019 04:00होमपेज › Kolhapur › ...तर शिक्षक होणार बडतर्फ

...तर शिक्षक होणार बडतर्फ

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 12:19AM

बुकमार्क करा

सावर्डे : वार्ताहर

सार्वत्रिक निवडणुकीत तिसरे अपत्य असणार्‍या इच्छुकांना निवडणूक लढवता येत नाही, असा नियम आहे. आता हा नियम केवळ निवडणुकीपुरताच उरलेला नाही, तर 2005 नंतर तिसरे अपत्य असणार्‍या ‘गुरुजीं’ची माहिती गोळा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 

मुख्याध्यापक व शिक्षकांना 2005 नंतर तिसरे अपत्य असल्यास त्यांना बडतर्फ करण्याची कार्यवाही होणार आहे. सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व मुख्याध्यापकांना शासन नियमानुसार 2005 नंतर तिसरे अपत्य जन्मलेले असल्यास अशा शिक्षकांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे अशा शिक्षकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. मात्र, यातून नेमकी माहिती समोर येणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.