Mon, Aug 19, 2019 01:21होमपेज › Kolhapur › कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 08 2017 10:35PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी टाऊन हॉल बागेजवळ धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे यांना देण्यात आले. 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अनेक मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. शिक्षक महासंघाने आंदोलने केली. गेल्या पाच वर्षांपासून शिक्षकांना नियुक्‍ती नसल्याने विनावेतन काम करावे लागत आहे. माहिती तंत्रज्ञान शिक्षक व विनाअनुदानित शिक्षक तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. शालार्थ प्रणालीत शिक्षकांची नावे घातलेली नाहीत. 2005 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांमध्ये पेन्शन प्रश्‍नावरून प्रचंड असंतोष आहे. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी कोल्हापूर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा. ए. बी. चौगले, सचिव प्रा. अविनाश तळेकर, प्रा. टी. के. सरगर, प्रा. विजय मेटकरी यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते.