Sat, Feb 23, 2019 01:59होमपेज › Kolhapur › तंबाखू मळा आणि घरला पळा..!

तंबाखू मळा आणि घरला पळा..!

Published On: Feb 11 2018 3:53PM | Last Updated: Feb 11 2018 3:53PMराशिवडे : प्रवीण ढोणे

दारू, गुटखा आणि तंबाखूचे व्यसन करून शाळेत हजेरी लावणार्‍या शिक्षकांना आता घरीच बसावे लागणार आहे. विद्यार्थ्यांसमोर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍या शिक्षकांना शाळेत येण्यास मज्जाव करा अथवा बंदी घाला, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केल्याने व्यसनाधीन शिक्षकांची नशा पळणार आहे.वारंवार आदेश, सूचना देऊनही व्यसन न सोडणार्‍या शिक्षकांना मात्र घरीच बसावे लागणार आहे.

ग्रामीण भागातील काही शिक्षक तंबाखू व दारूचे व्यसन करून विद्यार्थांना शिकवीत असतात, असे निदर्शनास आले आहे. मुले  शिक्षकांचे अनुकरण करतात, त्यामुळे विद्यार्थीही व्यसनाच्या आहारी जाण्याची भीती असते. त्यामुळे व्यसनामध्ये गुरफटलेल्या या शिक्षकांवर बंदी घालावी, अशी मागणी ओरियंटल ह्युमन राईटस् प्रोटेक्शन फोरमने शिक्षण विभागाकडे केली होती. याच तक्रारीची दखल घेत शिक्षण सहसंचालकांनी अशा व्यसनी शिक्षकांवर कठोर कारवाईच्या सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यामुळे व्यसन करून येणार्‍या शिक्षकांना प्रमोशन नाकारणे, पुरस्कारापासून दूर ठेवणे, शासकीय सुविधांपासून वंचित ठेवणे या कारवाया होणार आहेत.

त्यामुळे व्यसन करणार्‍या शिक्षकांवर थेट निलंबनाचीही कारवाई होणार असल्याने व्यसन करणार्‍या शिक्षकांची नशा या निर्णयामुळे उतरली आहे.