Fri, Sep 21, 2018 22:00होमपेज › Kolhapur › शिक्षकांचा आंदोलनाचा पवित्रा!

शिक्षकांचा आंदोलनाचा पवित्रा!

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 12:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘बीएलओ’ कामे बंद करावीत, यासाठी न्यायालयीन लढाईसह टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय मुख्याध्यापक व शिक्षकांच्या बैठकीत घेण्यात आला. 

मुख्याध्यापक संघात शहरातील मुख्याध्यापक व शिक्षकांची बैठक झाली. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ अध्यक्षस्थानी होते. यावेळी राजेश वरक यांनी माध्यमिक शिक्षक संघ व टी.डी.एफ.च्या बैठकीतील चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले, बीएलओ सारखी अशैक्षणिक कामे शिक्षकांनी नाकारली पाहिजेत. रस्त्याबरोबरच न्यायालयीन लढा आवश्यक आहे. मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील म्हणाले, मुख्याध्यापक संघाने दाखल केलेल्या याचिकेचा अंतरिम निकाल लागला आहे. त्यामुळे कोणत्याही शिक्षक कर्मचा-याला बी.एल.ओ.च्या कामाची सक्ती करता येणार नाही. तसे झाल्यास अवमान याचिका दाखल करु.

शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले, सर्वांनी एकजूट दाखवून संघटन मजबूत करून शासनाशी लढले पाहिजे. सर्व मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
 स्वागत जे.के पाटील यांनी केले. प्रास्ताविक कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश वरक यांनी केले. आभार अनिता नवाळे यांनी मानले. यावेळी माध्यमिक शिक्षक संघ व टी.डी.एफ.चे  कार्यवाह ईश्‍वरा गायकवाड, संजय चोरमारे, जयसिंग देवकर, शशिकांत सावंत, महावीर मुडबिद्रीकर, संजय समुद्रे आदी उपस्थित होते.