Tue, Nov 13, 2018 06:50होमपेज › Kolhapur › प्रत्येक मुलं शिकली पाहिजे यासाठी सरांची तळमळ :  शिवाजी वसंत भोसले 

प्रत्येक मुलं शिकली पाहिजे यासाठी सरांची तळमळ :  शिवाजी वसंत भोसले 

Published On: Sep 05 2018 10:26AM | Last Updated: Sep 05 2018 10:58AMमी श्री शिवाजी वसंत भोसले देशमुख हायस्कूल साने गुरुजी वसाहत प्रणित सन्मित्र विद्यालय कोल्हापूर येथे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. माझे प्राथमिक शिक्षण मुरगूड ता कागल येथील शिवाजी विद्यामंदीर शाळा क्र .२ येथे झाले. मला शिकविणारे शिंदेवाडी ता. कागल येथील गुरुजी ईश्वरा शिंदे हे आदर्श आहेत. त्यांच्या कामचुकारपणा मी पाहिला नाही माझे प्रत्येक मुलं शिकली पाहिजेत यासाठी त्यांची तळमळअसायची. म्हणूनच मी आज इथ पर्यंत पोहचलो. तळमळ हेच त्यांच्या दिर्घ व निरोगीआयुष्याचे कारण असे मी मानतोय. आज ते ९२ वर्षाचे असूनही ५-६ कि मी चालत प्रवास करतात. आज माझी २९ वर्ष नोकरी झाली. ५ वर्षे ६ माहने नोकरी शिल्लक आहे. परमेश्वर माझ्या गुरूंना असेच दिर्घ व निरोगी आयुष्य देवो जेणे करून माझा निरोप समारंभचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना व शिक्षक दिनानिमित्य माझ्या गुरूंना सलाम