Mon, Mar 25, 2019 02:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › ए.टी.पाटील सर शिगांवकर यांच्या आदर्श व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव माझ्या जीवनात बदल घडवून गेला

ए.टी.पाटील सर शिगांवकर यांच्या आदर्श व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव माझ्या जीवनात बदल घडवून गेला

Published On: Sep 05 2018 10:10AM | Last Updated: Sep 05 2018 10:10AMकै.आत्माराम तुकाराम पाटील उर्फ ए.टी.पाटील सर शिगांवकर यांच्या आदर्श व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव माझ्या जीवनात बदल घडवून गेला. सर अण्णा या नावाने ओळखले जात असत. मी अण्णांना पाहीलेले नाही तर त्यांचे चरित्र वाचले आहे .तसेच त्यांच्याबदद्ल माझ्या वडिलांकडून बरीचशी माहीती मला मिळाली. अण्णा शिगांव ते वडगांव पायी अनवानी चालत येत असत. वारणा नदीला पूर आलेला असला, तरी अण्णा पुरातू पोहत, प्रसंगी मुलांना खांद्यावरती बसवून येत जात असत. अण्णांचे सर्वात आवडते विषय इंग्रजी व गाणित होते. अत्यंत सोप्या पद्धतीने मुलांना समजेल असेच त्यांचे अध्यापन होते. अण्णा वडगांव विद्यालय, वडगांवचे आद्य संस्थापक होत. निस्वार्थी,निगर्वी व एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे अण्णा. अशा या अण्णांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा प्रभाव बरेच काही सांगून जातो. मला अभिमान आहे की, मी अशा विद्यालयात शिक्षक म्हणून अध्यापनाचे काम करतो. अण्णांना विनम्र अभिवादन!     

- मिलींद बारवडे सर, वडगांव विद्यालय,वडगांव