Tue, Mar 26, 2019 22:24होमपेज › Kolhapur › स्वाईन फ्लूची व्याप्‍ती रुग्णांना धास्ती

स्वाईन फ्लूची व्याप्‍ती रुग्णांना धास्ती

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 1:28AMकोल्हापूर ः एकनाथ नाईक 

जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे संकट गंभीर होत चालले आहे. नऊ महिन्यांत 91,350 हजार रुग्णांची तपासणी झाली आहे. यामध्ये 955 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 49 रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा झाली आहे. 

स्वाईन फ्लूने जिल्ह्यातील तीन व जिल्ह्याबाहेरील एकाचा बळी घेतला आहे. सध्या शहरातील खासगी दवाखान्यात 9 स्वाईन फ्लूचे रुग्ण उपचार घेत आहेत. थंड आणि दमट वातावरण स्वाईन फ्लू यास पोषक असल्याने जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे विषाणू फैलावू लागल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या फौलावाची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. पुरेशी जाणीव व जागृती नसणे आणि रुग्ण शोधून औषधोपचार करण्यात होत असलेली दिरंगाई यामुळेेच हा आजार बळावत चालला आहे. गणेशोत्सव काळात खबरदारी घेतली नाही, तर परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्वाईन फ्लूची जनजागृती मोहीम गतिमान करणे गरजेचे आहे. 

...अशी घ्या काळजी 

खोकताना तोंडावर रूमाल धरणे, दर दोन तासांनी साबणाने हात धुवावेत. घराबाहेर असल्यास कोरड्या कागदाने हात पुसावेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. स्वाईन फ्लूसद‍ृश रुग्णांपासून दूर रहावे. नाक, तोंड, डोळे यांना हात लावणे टाळावे. मास्क वापरणे. सकस आहार व पुरेेेशी झोप घ्यावी.

स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार आहे. हवेतून तो जलद पसरतो. त्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप असणार्‍या रुग्णांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार घ्यावेत. गर्दीत जाणे टाळावे. तोंडाला मास्क वापरणे अतिशय महत्त्वाचे आहे.
डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक