Thu, Nov 15, 2018 10:33होमपेज › Kolhapur › ‘स्वाभिमानी’ आज रणशिंग फुंकणार

‘स्वाभिमानी’ आज रणशिंग फुंकणार

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटना आज दुपारी दसरा चौकातून ऊस दराच्या दुसर्‍या टप्प्यातील लढ्याचे रणशिंग फुंकणार आहे. पहिल्या उचलीचा दिलेला शब्द न पाळणार्‍या कारखानदारांविरोधात व कारवाई न केल्याबद्दल साखर सहसंचालक यांना जाब विचारण्यासाठी शनिवारी दुपारी 2 वाजता साखर सहसंचालक कार्यालयावर भव्य मोर्चा निघणार आहे. 

जिल्ह्यातून 10 हजारांहून अधिक शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरवून शक्तिप्रदर्शनाची तयारी ‘स्वाभिमानी’ने केली आहे. या मोर्चाचे नेतृत्व खा. राजू शेट्टी हे करणार आहेत. प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जि. प.चे माजी सभापती सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यानवर, रमेश भोजकर यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे.