Thu, Jul 18, 2019 08:29होमपेज › Kolhapur › ई वॉर्डातील काही भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद

ई वॉर्डातील काही भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद

Published On: Feb 10 2018 1:31AM | Last Updated: Feb 09 2018 11:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रामधील उंच टाकीकडे जाणार्‍या दाब नलिकेस गळती लागली आहे. ती गळती काढण्याचे काम सोमवारी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे सुरू करण्यात येणार आहे. परिणामी सोमवारी उंच टाकीवरून वितरित होणार्‍या भागाला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. यात गोळीबार मैदान परिसर, उलपे मळा, कसबा बावडा परिसर, लाईन बाजार, पोलिस लाईन, रमणमळा परिसर, महावीर कॉलेज परिसर, नागाळा पार्क परिसर आदींसह इतर भागांचा समावेश आहे.

पाणीपुरवठा होऊ शकणार नसलेल्या भागाला महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.