Wed, Jul 17, 2019 20:30होमपेज › Kolhapur › उतार्‍यात कोल्हापूर, गाळपात पुणे अव्वल

उतार्‍यात कोल्हापूर, गाळपात पुणे अव्वल

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 11:55PM

बुकमार्क करा

राशिवडे : प्रतिनिधी

राज्यामध्ये चालू गळीत हंगामामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने साखर उतार्‍यामध्ये बाजी मारली आहे. तर गाळपामध्ये मात्र पुणे विभाग अव्वल ठरला आहे. राज्यात आजअखेर 304.35 लाख मे. टन उसाचे गाळप झाले असून, 303.97 लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखर उतारा 9.99 इतका  राहिला आहे. सर्वात निचांकी गाळप नागपूर विभागामध्ये 1.90 लाख मे. टन झाले असून, औरंगाबाद विभागाचा साखर उतारा 8.33 इतका निचांकी आहे.

चालू गळीत हंगामामध्ये सहकारी 97 व खासगी 80 अशा 177 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला.  पुणे विभागामध्ये सर्वाधिक 30 खासगी साखर कारखाने असून, या विभागामध्ये 120.41 लाख मे. टनाचे गाळप झाले आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागाने 72.39 लाख मे. टनांचे गाळप केले आहे. 

सर्वाधिक साखर कारखाने पुणे विभागामध्ये 60, तर त्यापाठोपाठ कोल्हापूर  विभागामध्ये 37 साखर कारखाने आहेत. पुणे विभागामध्ये 2,44,130 दैनिक गाळपक्षमता आहे. त्यामुळे गाळपामध्ये पुणे विभाग अव्वल राहिला आहे.