Thu, Jul 18, 2019 20:54होमपेज › Kolhapur › ‘तो’ मृत्यू ट्रॅक्टरवरून पडून नव्हे, तर गळा आवळल्याने

‘तो’ मृत्यू ट्रॅक्टरवरून पडून नव्हे, तर गळा आवळल्याने

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 07 2018 1:08AMकागल : प्रतिनिधी

म्हाकवे येथील ऊसतोडणी कामगार स्वप्निल ऊर्फ चंद्रकांत राजू खोडे (वय 24) या तरुणाचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. 

ट्रॉलीवरील सरकलेला ऊस सरळ करीत असताना स्वप्निल सोमवारी सायंकाळी रस्त्यावर पडला. बेशुद्धावस्थेत त्याला कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर स्वप्निलचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.

दरम्यान, बारा फुटांवरून पडून मृत्यू होतो का? उसाने भरलेल्या ट्रॉलीमधील दोराचा गळफास लागू शकतो का? याची प्रात्यक्षिके अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक काकडे, करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सूरज गुरव, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याप्रकरणी 13 साक्षीदारांचे पोलिसांनी जबाब नोंदविले असून, नक्की घटना काय आहे, याची सखोल चौकशी पोलिस करीत आहेत.