Thu, Feb 21, 2019 07:50होमपेज › Kolhapur › साखर कारखान्यातील कचरा, शेणापासून सीएनजी गॅस

साखर कारखान्यातील कचरा, शेणापासून सीएनजी गॅस

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 12:40AM

बुकमार्क करा
कुडित्रे :  प्रा. एम. टी. शेलार

देशातील बहुतांश साखर कारखाने ऊस गाळप करून त्याच्या रसापासून साखर तयार करतात. या प्रकियेत अनेक प्रकारचा कचरा, वेस्ट निर्माण होतो, जसे की प्रेसमड. याचा वापर काही कारखाने हे प्रेसमड खड्ड्यात साठवून खत तयार करतात. हे प्रेसमड आणि शेण मिसळून त्यापासून बायो-सीएनजी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस  तयार करण्यात कानपूरच्या राष्ट्रीय साखर संस्थेला नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेला यश मिळाले आहे. या गॅसवर  वाहने चालतात. विशेष म्हणजे, हा गॅस एलपीजीपेक्षा स्वस्त आहे.

15 रुपयांत एक किलो गॅस

90 टक्के प्रेसमड, त्यात 10   टक्के शेण मिसळून त्यापासून एक किलो गॅस तयार होतो. एक किलो प्रेसमडची किंमत 25 पैसे आहे आणि 30 किलो प्रेसमडमध्ये एक किलो गॅस तयार होतो. म्हणजे 7.50 रुपयांचा प्रेसमड लागतो. शेण अधिक प्रकिया खर्च मिळून 1 किलो गॅसचा एकूण उत्पादन खर्च 15 रुपये येतो.
एन.एस.आय.चे संशोधन 

एन.एस.आय.चे संशोधक फेलो डॉ. शिखा सिंह यांनी डॉ. सीमा परोहा व डॉ. संतोष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले आहे. प्रेसमडबरोबर सीवेज, शेणाची स्लरी, हिरवा पाला, इतर वेस्ट मिसळून हा बायोसीएनजीचे उत्पादन करण्यात यश मिळवले आहे.

...असा तयार होतो हा गॅस

प्रेसमड आणि शेण मिसळून हे मिश्रण एका विशिष्ट यंत्रात टाकले जाते. यातून हा गॅस तयार होतो. त्याचे शुद्धीकरण करून हायड्रोजन सल्फाईड गॅस वेगळा केला जातो. हा शुद्ध गॅस यात 95 टक्के मिथेन गॅस असतो. तो ज्वालाग्रही असतो. यावर दाब देऊन हा बायोसीएनजी सिलिंडरमध्येसुद्धा भरता येतो.