Tue, Jun 25, 2019 15:31होमपेज › Kolhapur › ऊस बिलासाठी उद्यापासून ऊसतोडी बंद : स्वाभिमानी

ऊस बिलासाठी उद्यापासून ऊसतोडी बंद : स्वाभिमानी

Published On: Jan 12 2019 12:47PM | Last Updated: Jan 12 2019 12:47PM
कुरुंदवाड: प्रतिनिधी 

साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर मुदतीत जमा करण्यात आली नाहीत. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कुरुंदवाड शहरात असणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोक करुन उद्यापासून ऊसतोडी बंद करण्यात येणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या व कारखानदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.  त्यामुळे कारखान्यांच्या कार्यालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य आण्णासाहेब चौगुले, शहर अध्यक्ष दत्तात्रय गुरव, माजी नगरसेवक जिंनाप्पा भबीरे, मोनाप्पा चौगुले, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे, बाहुबली पाटील, सचिन पाटील, सदाशिव मगदूम, शांतिनाथ भबीरे, नंदकिशोर पाटील, धोंडीराम चौगुले आदी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.