Sat, Feb 16, 2019 19:37होमपेज › Kolhapur › ‘उदय साखर’चा तीन हजार प्रतिटन दर

‘उदय साखर’चा तीन हजार प्रतिटन दर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बांबवडे : प्रतिनिधी

बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील अथणी शुगर संचलित उदयसिंहराव गायकवाड  साखर कारखान्याच्या चालू हंगामासाठी प्रतिटन पहिला हप्‍ता 2900 व दुसरा हप्‍ता 100 असा 3000 दर देणार असल्याची माहिती अथणी शुगरचे चेअरमन श्रीमंत पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, आमचा साखर कारखाना 3000 दर देणार असून तो दर एफआरपीपेक्षा 380 रु. जादा आहे. या साखर कारखान्यासाठी  येणार्‍या उसाचे वजन कोठेही करावे व परत आमच्याकडे ऊसपुरवठा करावा. वजनकाट्याबाबत आम्ही दक्ष आहोत. अथणी शुगरचे कार्यकारी संचालक योगेश पाटील म्हणाले, उदय साखरचे चार लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सभासद उत्पादकांनी साखर कारखान्यास ऊसपुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन केले. या वेळी युनिटप्रमुख आर. के. सोनवने, चिफ केमिस्ट प्रल्हाद पाटील, चिफ इंजिनीअर सर्जेराव पाटील, उदय साखर कारखाना कार्यकारी संचालक भगवान पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.