Wed, Jul 24, 2019 01:58होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात ४८२.८८ कोटी एफ.आर.पी.थकीत!  

जिल्ह्यात ४८२.८८ कोटी एफ.आर.पी.थकीत!  

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 11:17PMकुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची एकूण 482 कोटी 88 लाख रुपयांची एफ.आर.पी. नुसार बिले थकीत आहेत. कारखाना निहाय आकडेवारी अशी (सांगली जिल्ह्याची 79 कोटी 97 लाख रुपयांची एफ.आर.पी. थकीत असून, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याची थकबाकी 562 कोटी 85 लाख रुपये आहे. 

खर्चाच्या बाबतीत कारखाने सुसाट!

 17 डिसेंबर 2002 रोजी साखर आयुक्तांनी साखर कारखान्यासाठी प्रक्रिया खर्चाची (कन्व्हर्जन कॉस्ट) आदर्श मानके (नॉर्म्स) तयार केली होती. त्यानुसार एक टन उसापासून साखर तयार करण्यासाठी इंधनावर प्रतिटन 16 रुपये, विमाखर्च प्रतिटन 04 रुपये, रिपेअर्स अ‍ॅण्ड मेंटेनन्स 20 प्रतिटन रुपये, फॅक्टरी ओहरहेडस प्रतिटन 15 रुपये, कंझ्युमेबल केमिकल्सवर प्रतिटन 24 रुपये , खेळत्या भांडवलावरील व्याज प्रतिटन 60 रुपये, घसारा प्रतिटन 30 रुपये, व्यवस्थापन खर्च (पगार, विक्री व विपणन) प्रतिटन 120 रुपये, पॅकिंग्ज व गणी बॅग्ज प्रतिटन 30 रुपये याप्रमाणे प्रतिटन 319 रुपये प्रक्रिया खर्च असला पाहिजे, असे बंधन घातले होते. त्यामुळे साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चाची तुलना करता येत होती व कारखानेही कॉस्ट कॉन्शस होते. नाबार्डनेही महाराष्ट्रात तोडणी वाहतूक खर्च प्रतिटन 150 रुपयेच असला पाहिजे, असे बंधन घातले होते व प्रक्रिया खर्च प्रतिक्विंटल 225 रुपयेच असावा, असे बंधन पॅकेजसाठी निश्‍चित केले होते, पण मानके अडचणीची ठरत असल्यामुळे ही मानके कालबाह्य झाल्याचे कारण देत साखर आयुक्तालयाने ही मानकेच रद्द केली. मानके गेल्यापासून कारखाने बेलगाम झाले व आर्थिक शिस्त बिघडली. खर्चाचे ऑडिट व तुलना करणे कठीण झाले.
ज्या मानाने कारखान्यांचे खर्च वाढले त्या प्रमाणात ऊसदर वाढला नाही. मानके गेल्यामुळे बेताल कारखाने आता ऊस उत्पादकांच्या एफ.आर.पी.च्या हक्कालाच सुरुंग लावत आहेत. ही मानके नव्याने निश्‍चित करून चाप लावण्याची गरज आहे. (क्रमशः)