Mon, Nov 19, 2018 06:18होमपेज › Kolhapur › साखरेचे निर्यात शुल्क माफ केल्याच्या निर्णयाचे स्वागत

साखरेचे निर्यात शुल्क माफ केल्याच्या निर्णयाचे स्वागत

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

केंद्र सरकारने साखरेचे निर्यातशुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत शेतकरी नेत्यांसह जाणकारांकडून करण्यात आले. परंतु, यासह साखरेची बाजारातील एकूण परिस्थिती पाहता आणखी काही निर्णय घ्यायला हवेत, अशा प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात आल्या. 

निणर्यास उशीर केलाखा. राजू शेट्टी

साखरेचे निर्यात शुल्क माफ करण्याचा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता. निर्णयास उशीर करण्यात आला आहे. मात्र, आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. हा एक निर्णय घेऊन शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. आम्ही मागण्या करत असलेले निर्णय घ्यायला हवेत. 

 पुन्हा शुल्क आकारू नये  ः रघुनाथदादा पाटील (ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटना)

चांगला निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. निर्णयाला उशीर झाला असला तरी योग्य भूमिका  घेतली आहे. यापुढे पुन्हा शुल्क आकारू नये, अशी आमची मागणी आहे. या निर्णयात बदल करू नये.

 निर्णयाचे स्वागत; पण आणखी निर्णय घ्यावेत पी. जी. मेढे,मानद तज्ज्ञ सल्लागार, राजाराम सहकारी साखर कारखाना

निर्यात शुल्क माफ करण्याचा निर्णय चांगला आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. परंतु, साखरेची परिस्थिती चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर सक्‍तीच्या निर्यात कोट्याची आम्ही केलेली मागणी तत्काळ मान्य करायला हवी. तसेच सक्‍तीच्या निर्यातीस अनुदान द्यायला हवे. यासह चाळीस टन लाख  साखरेचा  बफर स्टॉक करावा. साखरेबाबतचे निर्णय सरकारने एकत्रितपणे घ्यायला हवेत.