Fri, May 24, 2019 06:37होमपेज › Kolhapur › एसटी कर्मचार्‍यांनी अचानक सुरू केलेला संप मागे

एसटी कर्मचार्‍यांनी अचानक सुरू केलेला संप मागे

Published On: Jun 09 2018 10:18PM | Last Updated: Jun 09 2018 10:18PMकोल्‍हापूर : प्रतिनिधी

आज एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते आणि विविध कर्मचारी संघटनांमध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे रात्री उशीरापर्यंत चर्चा करण्यात आली. एसटी कर्मचार्‍यांनी अचानक सुरू केलेला संप मागे घेऊन कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्यास सांगावे, असे आवाहन त्यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल उपस्थित होते. मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, इंटकचे मुकेश तिगोटे, कास्ट्राईब संघटनेचे निरभवणे, इंटकचे श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते. संप मागे घेत असल्याची मान्यताप्राप्त संघटनेसह इतर विविध संघटनांनी घोषणा केली आहे.