Tue, Jul 16, 2019 21:56होमपेज › Kolhapur › एस.टी. झाडावर आदळून 77 जखमी 

एस.टी. झाडावर आदळून 77 जखमी 

Published On: Aug 28 2018 1:26AM | Last Updated: Aug 28 2018 12:22AMचंदगड : प्रतिनिधी

चंदगड-हेरे मार्गावर सुळये येथे एस.टी.  झाडावर आदळून 77 प्रवासी जखमी झाले. चालक व वाहकासह 31 प्रवासी गंभीर आहेत. जखमींना गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. भरधाव टेम्पोला चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात सकाळी झाला. चंदगड पोलिसांत याची नोंद  आहे.

चंदगड आगाराची कोदाळी मुक्‍कामी गेलेली बस सकाळी चंदगडला येत होती. बसमध्ये प्रवासीही खचाखच भरले होते. बस सुळये येथील वळणावर आली असताना समोरुन  आलेल्या डंपरला चुकविताना चालकाने बस बाजूला घेतली असताना चिखलातून घसरून बस झाडावर आदळली. यावेळी जोराचा बे्रक लागल्याने सर्व प्रवासी समोरच्या सीटवर जावून आदळले. प्रवाशांच्या नाकाला, तोंडाला गंभीर दुखापत झाली. यामध्ये सिकंदर गेडाम (वाहक, चंदगड) लता कडुकर (कोनेवाडी), आनंदी गावडे, दत्ताराम गावडे (रायंदेवाडी), कैलास पाटील (खामदळे), अश्‍वगंधा दळवी, ज्योती दळवी, सचिन दळवी, परशराम रामगच्चे, जयश्री दळवी, सुजाता गोरे (सर्व रा. गुळंब), अनंत कांबळे, वामन गवस, राधिका गावडे, रुक्मिणी गावडे, कृष्णा गावडे, राज गावडे, शुभम दळवी, रामचंद्र देसाई (कोदाळी), लक्ष्मण कदम (किलवडे), रेखा चौगुले (तिलारीनगर), सुमित्रा गुरव, रामकृष्ण गवस, लक्ष्मण गवस, उत्तम गवस, रुक्मिणी गवस, नागोजी लांबोर (सर्व रा. कळसगादे), संध्या लाड (शिरगाव), सावित्री शिंदे (भोगोली), लक्ष्मी नाईक (चौकुळ), रुक्मिणी शंकर नाईक (डुक्‍करवाडी) यांच्यासह 77 जण जखमी झाले आहेत.