Mon, Nov 12, 2018 23:45होमपेज › Kolhapur › यामाहाचा स्फोट : चार जखमी

यामाहाचा स्फोट : चार जखमी

Published On: Mar 01 2018 1:38AM | Last Updated: Mar 01 2018 12:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मणदूर (ता. गगनबावडा) येथे सायंकाळी क्रिकेटची मॅच जिंकल्याचा जल्लोष करताना यामाहा गाडीचा स्फोट होऊन चौघे जखमी झाले. शरद आनंदा आंग्रे (वय 14), अजित धोंडिराम जाधव (17), ओंकार धोंडिराम चौगले (20), अमर जयवंत गोरुले (20, सर्व रा. मणदूर) अशी जखमींची नावे आहेत. स्पर्धेतील शेवटचा सामना रव्याचीवाडी विरुद्ध एस. के. स्पोर्टस् यांच्यात झाला. अंतिम सामना संपल्यानंतर खेळाडू व समर्थकांनी मैदानावर जल्लोष केला. तसेच चषकासह मणदूर गावातून विजयी मिरवणूक काढली. 

मिरवणुकीत यामाहा गाडीचा अचानक स्फोट झाला. यामध्ये शरद आंग्रे याच्या मानेला व हाताला गंभीर दुखापत झाली.