Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Kolhapur › ब्लॉग : कोल्हापुरात घुमतोय स्पोर्ट्स बाईकचा आवाज 

ब्लॉग : कोल्हापुरात घुमतोय स्पोर्ट्स बाईकचा आवाज 

Published On: Mar 12 2018 5:03PM | Last Updated: Mar 12 2018 5:11PMअनिरुद्ध संकपाळ : पुढारी ऑनलाईन 

देश स्वतंत्र झाला, त्या वेळी भारतात उद्योग धंद्यांची सुरुवात करण्याची गरज होती. त्याच सुमारास कोल्हापुरातील उद्यम नगरमध्ये विविध उद्योगधंदे सुरू झाले. यातील प्रमुख उद्योग हा कास्टिंगचा. या उद्यागोची ख्याती जगभरात पसरलेली. याच भागातून इंम्पोर्टेड गाड्यांचे पार्ट तयार होऊन परदेशात जातात. पण, हेच उद्यम नगर आता कात टाकतंय. ज्या गाड्यांचे पार्ट उद्यम नगरात तयार होत होते त्याच इंम्पोर्टेड  गाड्यांच्या शोरुम्स या भागात सुरू झाल्या आहेत. 

मुळात कोल्हापूरही बदलतंय. या शहराचे बदल उल्लेखनीय आहेत. कोल्हापुरी तांबडा पांढऱ्या आणि चटकदार मिसळ बरोबरच पिझा आणि बर्गर यांची चव देखील चाखायला मिळते. मग या बदलात उद्यमशील उद्यम नगर कसे मागे पडेल? उद्यम नगरातील त्या ग्रीसने माखलेल्या ऑइल इंजिन  कारखाण्याची आणि प्रांगणात विस्कटलेल्या सोनेरी वाळूच्या फौंड्रीची जागा दर्शनी भल्या मोठ्या काचा लावलेल्या चकचकीत शोरूम्स घेत आहेत.

साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी उद्यम नगरच्या मधून जाणाऱ्या रस्त्याचे रुप पालटले. रस्ता चकचकीत झाला. मग याच चकचकीत रस्त्याच्या दुतर्फा चकचकीत शोरूम्स झाल्या. या शोरूम्स आहेत स्पोर्ट्स बाईकच्या. ज्या भागातून, फौंड्रीतून याच गाड्यांच्ये सुटे भाग तयार होऊन जात होते त्या भागात या गाड्यांच्या शोरूम्स झाल्या आहेत. या आधीही उद्यम नगरात दोन चाकी, चार चाकी गाड्यांच्या शोरूम्स होत्या पण आता यामा, कावासाकी, बेलेनी या सारख्या इम्पोर्टेड स्पोर्ट्स बाईकच्या शोरूम्स आपले लक्ष वेधून घेत आहेत. कोल्हापुरात या भल्या मोठ्या टायर असणाऱ्या, विशिष्ठ फायरिंग असणाऱ्या इम्पोर्टेड गाड्या याआधी मोजक्याच बंगल्यांच्या पार्किंग मध्ये दिसायच्या. या इम्पोर्टेड गाड्या बघण्यासाठी स्पोर्ट्स बाईक प्रेमी कायम त्या बंगल्यात डोकावायचे. आता याच स्पोर्ट्स बाईक आपल्याला शोरूम मधून खुणावत आहेत. 

जागतीकीरणानंतर बदलत चाललेल्या शहरांचे हे उत्तम उदाहरण आहे. गेल्या दशकापासून  भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहण्यात येत आहे. त्यामुळे या इंम्पोर्टेड बाईक तयार करणाऱ्या कंपन्यांनी भारतातील बाजरपेठेची गरज ओळखून आपल्या उत्पादनात बदल केले आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे इटलीच्या बेनेली आणि जपानच्या कावासाकीने साधारण २ लाखापासून सुरु होणाऱ्या बाईक्स भारतीय बाजारात आणल्या आहेत. 

या गाड्यांच्या किमती अशा 

बेनेली TNT 25 (१.८७लाख) 

Image may contain: motorcycle and outdoor


बेनेली TNT ३०० (३.१४ लाख)

Image may contain: one or more people, motorcycle and outdoor


कावासाकी Z650 (५ लाखाच्या पुढे)

Image may contain: motorcycle

 

 कावासाकी निंजा (५. ३६ लाखाच्या पुढे)

Image may contain: motorcycle

बेनेली आणि कावासाकी या दोन नावाजलेल्या इंम्पोरर्टेड बाईकच्या शोरुम्स कोल्हापुरात आहेत. कोल्हापूर हे पुण्या मुंबईच्या तुलनेत आकाराने बरेच लहान असलेले शहर असले तरी दरडोई उत्पन्नात हे शहर अग्रेसर आहे. तसेच या शहरात बाईकवेडेही जास्त आहेत. बरेच बाईक ग्रुपही कोल्हापुरात आहेत. त्यामुळेच या नावजेलेल्या आंतरराष्ट्रीय ब्रँडनी कोल्हापुरात शोरुम्स उघडल्या आहेत. कोल्हापुरातील हा बदल लक्षवेधी आणि तितकाच स्वागतार्ह आहे.