Mon, Nov 19, 2018 17:13होमपेज › Kolhapur › आईच्या कष्टाच्या पैशावर चिरंजीवाची ‘चैनी’

आईच्या कष्टाच्या पैशावर चिरंजीवाची ‘चैनी’

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 11 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

आईने काबाडकष्टाने जमवलेल्या पैशावर चिरंजीवाने डल्ला मारल्याचा प्रकार विक्रमनगर परिसरात घडला. घरातील 25 हजारांची रक्कम घेऊन दोन दिवस पसार झालेला ‘दिवा’ रविवारी घरी परतला. मित्रांच्या संगतीने त्याने पैसे उडविल्याचे समजल्याने आईने त्याला थेट पोलिस ठाण्यात आणून पोलिसांसमोरच समज दिली. 

विक्रमनगरात राहणारी ही महिला अत्यंत हलाखीचे जीवन जगते. मुलाचे शिक्षण, पालनपोषण यासाठी ती पै- पै साठवत होती. इयत्ता सातवीत शिकणार्‍या मुलाला मात्र याची कसलीही जाण नाही. तीन दिवसांपासून त्याने मित्रांच्या संगतीने घरातील 25 हजार रक्कम परस्पर हडप केले. या पैशावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मनसोक्त चैनी केली. रविवारी तो घरी परतला.

घरातील रक्कम गायब झाल्याने आईने त्याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या पठ्ठ्याने पोलिस ठाण्यात आल्यानंतर याची कबुली दिली. हा प्रकार पाहणार्‍या पोलिसांसह ठाण्यात उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या.