Tue, Oct 24, 2017 16:47होमपेज › Kolhapur › लष्करी सेवा बजावताना कोल्हापूरच्या जवानाचा मृत्यू

लष्करी सेवा बजावताना कोल्हापूरच्या जवानाचा मृत्यू

Published On: Oct 12 2017 6:10PM | Last Updated: Oct 12 2017 6:10PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

दारुगोळा घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या गाडीला झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील जवानाचा मृत्यू झाला आहे. प्रवीण येलकर असे त्यांचे नाव असून, ते लष्करात मेजर पदावर कार्यरत होते. अद्याप कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

येलकर मुळचे भुदरगड तालुक्यातील बेगवडे गावचे असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार उद्या आजरा तालुक्यात बहिरेवाडी येथील भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानावर येलकर यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. लष्करी अधिकाऱ्यांनी आजरा तहसीलदारांना दिलेल्या माहितीनुसार, लडाखहून कारगिल सीमेकडे दारुगोळा घेऊन जाणाऱ्या गाडीचा अचानक टायर फुटला. त्यामुळे गाडी उलटून झालेल्या अपघातात येलकर यांचा मृत्यू झाला. येलकर यांच्या मागे आई-वडील, लहान भाऊ, पत्नी व सात वर्षांची मुलगी असा परिवार आहे.