Wed, Jun 26, 2019 17:48होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : विहिरीत बुडून जवानाचा मृत्यू 

कोल्‍हापूर : विहिरीत बुडून जवानाचा मृत्यू 

Published On: May 29 2018 9:58PM | Last Updated: May 29 2018 9:58PMचंदगड (जि. कोल्‍हापूर):  प्रतिनिधी

माणगाव येथील जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे.  संदीप सुरेश फडके (वय 35) असे मृत्‍यू झालेल्‍या जवानाचे नाव आहे. ही घटना आज (दि. २९ मे)सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. 

संदीप फडके हे १५ वर्षार्पूर्वी बेळगांव येथील मराठा लाइट इंफंट्रीमध्ये भरती झाले होते. सध्या ते जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. ते २ महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. दरम्यान, काल झालेल्‍या माणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत फडके यांचा पॅनेल विजयी झाल्‍याने ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.  संध्याकाळी ९ नंतर अंधारातून ते घरी जात होते. यावेळी वाटेतील शिवाजी फडके यांची विहिर खूपच अरुंद असल्याने विहिरीची भिंत त्‍यांच्या डोक्याला लागली आणि बेशुद्धावस्थेत पाण्यात पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला.