Thu, Jul 18, 2019 16:33होमपेज › Kolhapur › सहा ग्रामपंचायतींसाठी धूमशान

सहा ग्रामपंचायतींसाठी धूमशान

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 1:51AM

बुकमार्क करा

कुडित्रे : प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील केकतकवाडी, वाशी, शिरोली दुमाला, चिंचवाड, निटवडे आणि सांगवडेवाडी या सहा गावच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी सरपंचपदासाठी 15 आणि सदस्यपदासाठी 122 असे एकूण 137 उमेदवार रिंगणात आहेत. 26 डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. 

करवीर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. आज (गुरुवार) उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी सरपंचपदासाठी 15 आणि सदस्यांच्या 64 जागांसाठी 122 उमेदवार रिंगणात आहेत. 

वाशी : वाशी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी 02 आणि सदस्यांच्या 13 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत.  काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व शेतकरी कामगार पक्ष यांची महाआघाडी अशी दुरंगी लढत आहे. 4 नंबरच्या प्रभागात काँग्रेस विरुद्ध आर.पी.आय. आठवले गटाची स्थानिक आघाडी अशी लढत होत आहे. 

सांगवडेवाडी : या ग्रामपंचातीत सरपंचपदासाठी 3 उमेदवार रिंगणात असून, सदस्यांच्या 9 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. स्थानिक आघाड्यातच दुरंगी लढत रंगणार आहे. 

शिरोली दुमाला : सरपंचपदासाठी 3 आणि 13 सदस्यांच्या जागेसाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत. गोकुळचे अध्यक्ष विश्‍वासराव पाटील विरुद्ध कुंभीचे माजी उपाध्यक्ष, विद्यमान संचालक किशोर पाटील यांच्या गटात दुरंगी लढत होत आहे. 

केकतवाडी : सरपंचपदासाठी थेट लढतीत 2 उमेदवार व सदस्यांच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत.  काँग्रेसच्या दोन गटातच दुरंगी लढत होत असून, कृष्णात यादव यांचा गट विरुद्ध विद्यमान उपसरपंच कृष्णात ढोक यांचा गट अशी थेट दुरंगी लढत आहे. 

चिंचवाड : सरपंचपदासाठी 3 आणि 12 सदस्यांसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. 1 जागा रिक्‍त आहे. आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक गट अशी दुरंगी लढत आहे. 


निटवडे : सरपंचपदासाठी 2 आणि सदस्यपदासाठी 10 असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. स्थानिक आघाड्यांमध्ये दुरंगी लढत  होत आहे. 


वाशी आणि सांगवडेवाडीची सरपंचपदे ना. मा. प्रवर्ग महिला राखीव, केकतवाडी आणि चिंचवाडची सरपंचपदे ना.मा. प्रवर्गासाठी राखीव आहेत. शिरोली दुमालाचे सरपंचपद अ. जा. महिला राखीव असून निटवडेचे सरपंच खुले आहे. वाशी, केकतवाडी, शिरोली दुमाला व  निटवडे या ग्रा. पं. करवीर विधानसभा मतदार संघात तर चिंचवाड आणि सांगवडेवाडी या ग्रा. पं. दक्षिण विधानसभा मतदारसंघात आहेत.