Wed, Jul 17, 2019 09:58होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूरचा हरहुन्‍नरी गायक कोणार्क शर्माचे निधन 

कोल्‍हापूरचा हरहुन्‍नरी गायक कोणार्क शर्माचे निधन 

Published On: Aug 08 2018 1:24PM | Last Updated: Aug 08 2018 1:31PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्‍हापुरच्‍या संगीत क्षेत्रातला एक उदयोन्‍मुख गायक कोणार्क मदनलाल शर्मा याचे आज निधन झाले. उत्तुंग भरारी घेत कोल्‍हापुरचं नाव उज्‍ज्‍वल करणारा नवोदित गायक आज आपल्‍यात नाही. त्‍याच्‍या जाण्‍याने कोल्‍हापुरच्‍या संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीय. 

Image may contain: 1 person

कोणार्क व्‍यवसायाने गायक, संगीतकार. त्‍याने एस. के. पंत वालावलकर हायस्‍कूलमधून शालेय शिक्षण घेतले होते. तर महाविद्‍यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेजमधून पूर्ण केले. त्‍याने आपलं शिक्षण शिवाजी विद्‍यापीठातून पूर्ण केलं. व्‍होकल म्‍युझिकमध्‍ये त्‍यानं एमएची पदवी घेतली. 

Image may contain: 2 people, people standing and beard

विनम्र, हळवा आणि संवेदनशील गायक म्‍हणून कोणार्कची ओळख होती. काही वर्षांपूर्वीच त्‍याने आपल्‍या करिअरला सुरुवात केली. अनेक लाईव्‍ह शो, कार्यक्रम आणि पार्श्वगायक म्‍हणून रेकॉर्डिंग करत वाटचाल त्‍याने केली. या व्‍यतिरीक्‍त अनेक प्रकारची गाणी, जाहिरातींना त्‍याने आपला आवाज दिला होता. अनेक संगीत मैफिली आपल्‍या सुरेल आवाजने जिंकणार्‍या कोणार्कने अनेक पुरस्‍कार मिळवले. 

Image may contain: 1 person, sitting, beard and outdoor

आषाढी एकादशीला गायन
कोणार्कने पंढरपूर येथे आषाढी एकादशीला आपल्‍या जादूई आवाजाने गाणी गायली. त्‍याचे काही फोटोज त्‍याने आपल्‍या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. 

Image may contain: 1 person, beard, outdoor, water and close-up

कोणार्कचे नातेवाईक, मित्रमंडळींनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून शोक व्‍यक्‍त केला आहे. 

Image may contain: 1 person, standing