Tue, Jan 22, 2019 22:08होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : सिध्दनेर्लीतील अपघातात मुलगा ठार, वडील गंभीर

कोल्‍हापूर : सिध्दनेर्लीतील अपघातात मुलगा ठार, वडील गंभीर

Published On: Mar 10 2018 3:45PM | Last Updated: Mar 10 2018 3:45PMसिद्धनेर्ली : वार्ताहर

सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील तुकाराम  माने (वय ४६) आणि त्यांचे वडील दत्तात्रय माने (वय ६५) यांचा सिद्धनेर्ली  येथे ( एमएच ०९ ईएम ११००) ट्रकच्या मागील चाकामध्ये  सापडून हा अपघात झाला त्या मध्ये तुकाराम माने हे जागीच ठार झाले तर दत्तात्रय माने हे जखमी झाले.रेशन घेऊन आपल्या टुव्हीलर ( MH 09 EP4247) ने घरी जाताना हा अपघात झाला.

दत्तात्रय माने हे घरफाळा भरण्यासाठी आणि रेशन घेऊन जाण्यासाठी गावांमध्ये आले होते. ग्रामपंचायतीमध्ये माने यांनी घरफाळा भरून शेजारीच असणाऱ्या रेशन दुकानातून धान्य घेण्यासाठी गेले होते. यावेळी बायोमेट्रिकची समस्या आल्याने त्यांनी आपला मुलगा तुकाराम माने यांना बोलावून घेतले. यानंतर घरी धान्य घेऊन जात असताना सर्व्हिसिंग सेंटरजवळ ट्रक आणि त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये तुकाराम माने यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले तर वडील दत्तात्रय माने गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक ड्रायव्‍हर फरार झाला आहे.

तुकाराम माने पुलाची शिरोली येथे एका माध्यम संस्‍थेत काम करीत होते. पण गेल्या काही महिन्यापूर्वीच स्वतःचे दुकान त्यांनी चालू केले होते. त्यांना  तीन मुले व पत्नी असा परिवार आहे. त्‍यांची तीन मुले शिक्षण घेत आहेत. दत्तात्रय माने यांची तीन मुले अपघातात मृत झाली आहेत. यावेळीही तुकाराम माने यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्‍यक्‍त होत आहे. या अपघाताची नोंद कागलग पोलिसात झाली आहे.