Mon, Aug 19, 2019 18:31होमपेज › Kolhapur › सिद्धाळा महोत्सव: लावणीच्या बहारदार कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने

सिद्धाळा महोत्सव: लावणीच्या बहारदार कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने

Published On: Apr 23 2018 7:45AM | Last Updated: Apr 23 2018 7:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवण्याच्या उद्देशाने नगरसेविका जयश्री चव्हाण आणि चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने सिद्धाळा गार्डन येथे आयोजित सिद्धाळा महोत्सवाची रविवारी सांगता झाली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. महोत्सवाचा आजचा दिवस बहारदार लावणी कार्यक्रमाने गाजला. कार्यक्रमास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांची उपस्थिती होती. स्वागत सचिन चव्हाण यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाहन निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेला संग्राम देवणे, नॅशलन स्वीमर अहिल्या सचिन चव्हाण, ऑलंपीयाड सिद्देश जाधव, आर्यन सुभेदार, यज्ञेश चव्हाण यांना गौरवण्यात आले. तसेच चव्हाण कुटुंबीयांच्या सहकार्यायाने नुकतेच जन्मलेल्या 22 मुलींच्या नावे रु.1 हजार ठेव पावतीचे वाटप मुलींच्या पालकांना करण्यात आले. दरम्यान, महोत्सवात दिवसभर परिसरातील महिलांसाठी विविध स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, लकी ड्रॉ असे उपक्रम राबवण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना संयोजकांच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले. महोत्सवाची सांगता केला ‘इशारा जाता जाता..’ या बहारदार लावणी कार्यक्रमाने करण्यात आली.

यामध्ये साधना पुणेकर यांनी व सहकार्‍यांनी ठसकेबाज लावणी सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, सागर चव्हाण, संभाजी देवणे, लाला गायकवाड, शिवाजीराव कवठेकर यांच्यासह परसिरातील नागरिक उपस्थित होते.