Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Kolhapur › राही नाद खुळाच....! जिकून दाखवलंस...!!देशभरातून कौतुकाचा 'डबल बार'.....!!!

राही नाद खुळाच....! जिकून दाखवलंस...!!देशभरातून कौतुकाचा 'डबल बार'.....!!!

Published On: Aug 22 2018 5:19PM | Last Updated: Aug 22 2018 5:19PMजकार्ता : पुढारी ऑनलाईन 
जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी राही सरनोबतने सुवर्णवेध साधत शाहुनगरी कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा  खोवला आहे. राहीने २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारताला चौथे सुवर्ण पदक मिळवून देत आशियाई शुटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी पहिली भारतीय होण्याचा मान मिळवला. 

राहीवर ऐतिहासिक कामगिरीमुळे देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून राहीचे अभिनंदन करताना म्हणाले की राही आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तुझे अभिनंदन, हा तुझ्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी खास क्षण आहेच पण देशासाठीसुद्धा अभिमानाचा क्षण आहे, अशीच कामगिरी करत राहा, तुझ्या कामगिरीने आमची मान उंचावली आहे. हटके शुभेच्छा देण्यात नेहमीची आघाडीवर  असणाऱ्या माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सुद्धा हटकेच शुभेच्छा देताना राहीवर कौतुकाचा वर्षाव केला. 

भारतीय  ऑलिंम्पिक संघटना (आयओए)  केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, सत्यपालसिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, अभिनेता बोमन इराणी, माजी मंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेमधील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी राहीवर कौतुकाचा वर्षाव केला.