Sun, Aug 18, 2019 15:09होमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठातील धरणे आंदोलन मागे

शिवाजी विद्यापीठातील धरणे आंदोलन मागे

Published On: Mar 25 2018 12:37AM | Last Updated: Mar 24 2018 11:18PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेले धरणे आंदोलन शनिवारी आमदार सतेज पाटील यांच्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले. बबलू कराळेकर हा तरुण पात्र असतानाही त्याला विद्यापीठ प्रशासनाने नोकरीसाठी डावलल्याचा आरोप करत 19 मार्चपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते. 

आंदोलनात कराळेकर कुटुंबीयांसह जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर यांनीही सहभाग घेतला होता. आज सकाळी अकराच्या सुमारास आ. पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी कराळेकर यांचा प्रश्‍न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडून न्याय देण्याची मागणी करण्याचे आश्‍वासन आ. पाटील यांनी दिले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सुरेश कराळेकर, लैला कराळेकर, धारासिंग रजपूत, संगीता तामशीकर आदी उपस्थित होते.

Tags : Kolhapur, Kolhapur News, shivaji univercity, employment, recruitment,  protest, pull back