Sun, Nov 18, 2018 05:18होमपेज › Kolhapur › शिरोळ : कोथळीत जुगार अड्ड्यावर छापा

शिरोळ : कोथळीत जुगार अड्ड्यावर छापा

Published On: May 01 2018 5:07PM | Last Updated: May 01 2018 5:09PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर पोलिसांनी दुर्लक्ष केलेल्या शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे जुगार अडयावर अखेर टाकलेल्या छाप्यात पाच जणांना अटक करण्यात आली तर दोघांना नोटीस बजावण्यात आले आहे. या कारवाईत एकूण १ लाख ४२, ३५० रु. मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीत एका माजी युवा काँग्रेस तालुका अध्यक्षाचा समावेश आहे. 
राजाराम अर्जुन बागल (वय ५०), धोंडीबा भीमा धनगर (वय ५५) या दोघांना नोटीस पाठवण्‍यात आली आहे.

वृंदावन कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली तीन पानी जुगार अड्डा सुरू होता. जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्‍वाखालील पथकाने सोमवारी मध्यरात्री कारवाई केली.

वृषभ बापू पाटील (वय ४२), बाबुराव देवाप्पा इंगळे (वय ५९), शरद राजाराम हावळे (वय ४५), अजित भुजगोंडा पाटील (वय ४८), महादेव शिवा कुराडे (वय ४४) या ५ जणांना अटक करण्यात आली. सोमवारी मध्यरात्री जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. ८ हजार १५० रुपयांची रोकड, १७ हजार रु.चे सात मोबाईल, जुगाराचे साहित्य, १ टीव्ही, एक डिव्हीआर, ४ मोटरसायकली, गोलाकार टेबल्स असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस नाईक चंद्रशेखर कोळी यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक सदामते तपास करीत आहेत.