Tue, Jun 25, 2019 15:32होमपेज › Kolhapur › 'स्‍वाभिमानी'चे आंदोलन संपेपर्यंत ऊस वाहतूक करू नये

'स्‍वाभिमानी'चे आंदोलन संपेपर्यंत ऊस वाहतूक करू नये

Published On: Jan 13 2019 10:45AM | Last Updated: Jan 13 2019 10:45AM
कुरुंदवाड : प्रतिनिधी 

कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले आहे. कार्यकर्त्यांनी ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर अडवून ठेवली आहेत. मोकळ्या जाणाऱ्या ट्रॅक्टरांना आंदोलन संपेपर्यंत ऊस वाहतूक करू नये असे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी आंदोलकांशी हा आंदोलनापूर्वी तुटलेला ऊस असेल तर कारखान्याला जाऊ द्या शेतकऱ्यांचं नुकसान करू नका असे  सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आपल्या निर्णयाशी ठाम राहिले.

कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात दत्त सहकारी साखर कारखाना व जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर अडवून धरून आंदोलन संपेपर्यंत ट्रॅक्टर हलवू देणार नसल्याचा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मोकळ्या जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनाही अडवून आंदोलन संपेपर्यंत ऊस वाहतूक करू नये असा दम भरला आहे. पुतळा परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अण्णासाहेब चौगुले बंडू उंडाळे, दत्तात्रय गुरव, राघू नाईक, योगेश जीवाचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.