Sun, Feb 17, 2019 15:08होमपेज › Kolhapur › शरद पवारांचे चहापान खासदार महाडीकांच्या घरी

शरद पवारांचे चहापान खासदार महाडीकांच्या घरी

Published On: Feb 10 2018 8:18PM | Last Updated: Feb 10 2018 8:17PMकोल्हापूर : प्रतिनिधी - 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे रविवारी खासदार धनंजय महाडीक यांच्या घरी जाणार आहे. त्यानिमित्त पवार यांचे चहापान महाडीक यांच्या घरी होणार आहे. या भेटीत पवार यांच्यासोबत मुश्रीफ हेसुध्दा महाडीक यांच्या घरी जाणार का? त्यांच्यातील अबोला मिटणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शनिवारी रात्री पवार यांनी उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्या साईक्स एक्स्टेंशन येथील घरी जेवण घेतले. मात्र मात्र यावेळी राजकीय विषयावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले.  

राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ व खासदार महाडीक यांच्यात गेल्या काही दिवसापासून जुगलबंदी रंगली आहे. दोघांतील धुसफूस आता उघडउघड सुरू झाली आहे. मुश्रीफ यांनी सुरूवातीला पक्षाच्यावतीने शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांची लोकसभेला उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवेन, असेही मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. मुश्रीफ व महाडीक यांच्यातील वादावरून राष्ट्रवादीमध्ये दुफळी माजल्याचे स्पष्ट होते. त्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार हे महाडीक यांच्या घरी भेट देत असल्याच्या घटनेला महत्व प्राप्त होत असल्याचे सांगितले जात आहे.