होमपेज › Kolhapur › शाहूपुरी मारहाणप्रकरणी  पाच जणांना अटक

शाहूपुरी मारहाणप्रकरणी  पाच जणांना अटक

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 12:38AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

जागेचा ताबा घेण्यावरून शाहूपुरी व्यापारी पेठेत दोशी बंधूंना मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. अशोक पांडुरंग जाधव ऊर्फ नागराळे उस्ताद (वय 55, रा. कारंडे मळा), पवन संभाजी शिंदे (23), अमोल बाळू बागाव (25), महेश ज्ञानदेव बागडे (20), विकास विलास माने (24, रा. शाहूपुरी तालीम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

शाहूपुरी व्यापारी पेठेतील जागेचा ताबा घेण्यावरून दोशी बंधूंना अशोक जाधव ऊर्फ नागराळे आणि सहकार्‍यांनी बुधवारी सकाळी मारहाण केली होती. यामध्ये पंकज दोशी, तुषार दोशी, प्रशांत दोशी, अभय दोशी, प्रितेश दोशी जखमी झाले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सकाळी पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, 14 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.