Sun, May 26, 2019 18:40होमपेज › Kolhapur › लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 11:27PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

‘बहूजन हिताय, बहूजन सुखाय’, या उद्देशाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्च केले. त्यांनी केलेल्या दुरदृष्टीच्या कार्यामुळेच आज  कोल्हापूर विविध क्षेत्रांत जगभर नावारुपाला आले आहे. कोल्हापूरचे भाग्यविधाते असणार्‍या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त संस्था-संघटनांच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

राष्ट्रीय समाज पक्ष 

पक्षाचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सलिम पटवेगार यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश कचरे, सुशिल येडगे, चंद्रकांत खोंद्रे,सागर साळोखे, दशरथ भोसले आदी उपस्थित होते. 

आर्य क्षत्रिय समाज 

 आर्य क्षत्रिय समाजाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. गणेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मनिष माने, भानुदास सूर्यवंशी, उमेश बुधले, बाळकृष्ण सुर्यवंशी, सतिश करजगार आदी उपस्थित हेाते. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 

प्रतिमा पूजन प्रा.शहाजी कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी कुडलिक कांबळे, सतिश माळगे, विश्‍वास तरटे, दिलीप कोथळीकर, प्रदीप ढाले, दादासाहेब कांबळे, सागर कांबळे, रामभाऊ कांबळे, विजय शिंदे, भरत कांबळे आदी उपस्थित हेाते.

मिस क्लार्क हॉस्टेल 
शाहू जनता शिक्षण संस्था, संचलित मिस क्लार्क वसतीगृह आणि ब्ल्यू बर्ड इंग्लिश मेडियम स्कूलच्या वतीने संस्थेचे चेअरमन माजी आमदार अ‍ॅड.नानासाहेब माने यांच्या अध्यक्षस्थतेखाली हाजी गुजाब पटवेगार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. के.डी.कांबळे, राजेश माने, सुजाता माने, सुधाकर विणकरे, शशिकांत कसबेकर, अ‍ॅड.बाळासाहेब सरदेसाई, मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, उदय कुबडे, राजाराम माने,सात्ताप्पा साठे, हिंदूराव पाटील आदी उपस्थित होते.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी 
पाटीर्र्च्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष डी.जी.भास्कर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नंदकुमार गोंधळी, विद्याधर कांबळे, सोमनाथ घोडेराव, सुरेश सावर्डेकर, रमेश कांबळे, विलास भास्कर, मच्छिद्र राजशिल, सुरेश राजशिल, तानाजी कांबळे, संतोष कांबळे आदी उपस्थित होते. 
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस
राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकारीणी सदस्य डी.जी. किल्लेदार, ए.डी. निकम, सी.एम. गायकवाड, एम.व्ही. शिंदे, उदय देसाई, ए.व्ही. जाधव, सर्जेराव जाधव आदी उपस्थित होते. 

खंडोबा- वेताळ मर्दानी कलापथक

 खंडोबा- वेताळ तालीम व वस्ताद ठोंबरे आखाड्यातर्फे राजर्षि शाहू जयंती साजरी करण्यात आली. मनिषा ठोंबरे, शिवानी ठोंबरे, सरला गायकवाड यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शाहीर मिलींद सावंत यांनी शाहू महाराजांवरील शाहीरी कवणे गायिली. वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्याहस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन झघले. यावेळी किरण जाधव, शिवतेज ठोंबरे, बाळासाहेब शिकलगार, केदार ठोंबरे, यश राउत उपस्थित होते. 

ज्येष्ठ नागरिक संघ

संघाचे अध्यक्ष वसंतराव थोरात यांच्याहस्ते प्रतिमा पुजन झाले. दिनकर कांडगावकर यांनी शाहू महाराजांचा पोवाडा सादर केला. कराटे स्पर्धेत यश मिळविणारी पूर्वा पोवार हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी वसंत खांडेकर, युवराज राजवाडे, दत्तात्रय इंगवले, अजित शिंदे, लहू पाटोळे, मोहन खाबडे, प्रमिला आवळे आदी सदस्य उपस्थित होते. 

लोकजनशक्ती पार्टी

लोकजनशक्ती पार्टीतर्फे बागल चौकात शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. दोनवडे ग्रामपंचायत सदस्य वसंत पाटील यांच्याहस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले होते. यावेळी निशिकांत सरनाईक, राजू शिंदे, जी. डी. कांबळे, शैलेंद्र हाबळे, तकदीर कांबळे, तुलसीदास थोरात, अनिल कुरणे, संजय घोरपडे, संजय पन्हाळकर, श्रीधर कांबळे, पुंडलिक कांबळे उपस्थित होते. 

बोैद्ध अवशेष व विचार संवर्धन समिती 

शाहू जन्मस्थळ व दसरा चौकातील शाहू स्मारकांचे पूजन अध्यक्ष टी.एस. कांबळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब कांबळे, सर्जेराव थोरात, प्रविण कांबळे, विपुल वाडेकर, सुरेश कुरणे आदींच्या हस्ते झाले.

बालकल्याण संकूल 

जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना बालसंकूल येथे शाहू प्रतिमापूजन प्रा. सुरेश शिरोडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मानद कार्यवाह पद्मजा तिवले, अधिक्षक पी.के. डवरी, प्र.अधिक्षक पद्मजा गोरे यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. 

हिंदू महासभा

अखिल भारतीय हिंदू महासभेच्यावतीने शाहूनगर येथील राजर्षी शाहू पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय कुलकर्णी, दुर्गेश लिंग्रज, वसंतराव तावडे, प्रताप पवार, जयवंत निर्मळ, मारुती मिरजकर, वंदना शिंदे, सुवर्णा पोवार, विरेंद्र घोरपडे आदीं उपस्थित होते. 

रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया

पक्षाच्या गवई गटाच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रा. विश्‍वासराव देशमुख यांच्या हस्ते दसरा चौकातील पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी भाऊसाहेब काळे, सज्जन कांबळे, पांडूरंग कांबळे, भिमराव कांबळे, बबन शिंदे, अशोक घाडगे, रमेश शिवशरण, अनिल धनवडे, शिवाजी खामकर, गौतम सावंत, बी.के. सुतार, शोभा कुमठेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

लिंगायत बोर्डिंग 
वीरशैव लिंगायत समाज व दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजातर्फे लिंगायत बोर्डींग येथे शाहू जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सुनिल गाताडे व सुहास भेंडे, राजू वाली, अ‍ॅड. सतिश खोतलांडे, राजेश पाटील-वंदूरकर, चंद्रकांत हळदे, किरण सांगावकर, डॉ. गिरीष कोरे, शिवमूर्ती झगडे, शिवमूर्ती झगडे, उदय पाटील, बी.एस. पाटील, दत्तात्रय कोणीकिरे आदी उपस्थित होते.  

बहूजन दलित सेना 

राजर्षी शाहू जयंतीनिमीत्त दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी निलेश वायदंडे, किशोर माने, दादासाहेब माने, उदय गेंजगे, ारहुल चाळसकर, भरत गणेशाचार्य, गणेश माने, शुभम कुरळे उपस्थित होते. 

‘पांजरपोळ’संस्थेत शाहू जयंती साजरी

कोल्हापूर : प्रतिनिधी

उद्यनगर येथील श्री पांजरपोळ संस्थेत शाहू जयंती साजरी करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. डॉ. जाधव यांच्या हस्ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे सचिव बाळासाहेब मनाडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.संस्थेला सर्वोपतोरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमणभाई पटेल, विश्‍वस्त आनंदराव हिलगे, समकीन शहा, जसवंत शहा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, सुजित चव्हाण, माजी आमदार सुरेश साळोखे, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, उद्योगपती चंद्रकांत जाधव, वैशाली पिसे, दिलीप संकपाळ, संदीप कदम, डॉ .राजकुमार बागल, संतोष देसाई, डॉ. सागर होडगे, कमलाकर जगदाळे, मनीष झंवर आदींसह मान्यवर उपस्थित होते.