Sat, Feb 23, 2019 16:33होमपेज › Kolhapur › माद्याळ येथील घोडागाडी शर्यत स्पर्धेत तरुण गंभीर  

माद्याळ येथील घोडागाडी शर्यत स्पर्धेत तरुण गंभीर  

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 1:15AMसेनापती कापशी : प्रतिनिधी

माद्याळ (ता. कागल) येथे घोडागाडी शर्यत स्पर्धेत घोडागाडीस्वाराच्या पाठीमागे उभा राहिलेला राहुल उर्फ अक्षय संजय चौगले (रा. म्हाळुंगे, ता. राधानगरी) शड्डू मारत थरार करीत होता. यावेळी अचानक तोल जाऊन तो गाडीतून खाली पडला. जोरात आदळल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

जोतिबा तेलवेकर (रा. माद्याळ) यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त घोडागाडी शर्यत आयोजित केली होती. एक घोडागाडी प्रथम क्रमांकावर असताना गाडीत स्वाराच्या पाठीमागे अक्षय उभा होता. आपल्या गाडीचा प्रथम क्रमांक आल्याच्या आनंदात वेगवान गाडीमध्येच अक्षय हात सोडून शड्डू मारत होता. यावेळी अचानक तोल जाऊन तो जोरात खाली आपटला. पाठीमागून आलेली घोडागाडी व दुचाकी त्या तरुणाच्या अंगावरून गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला कोल्हापूरात खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

तेलवेकर यांच्यावर गुन्हा नोंद प्राण्यांच्या  शर्यतीवर मनाई असताना विनापरवाना बेकायदा घोडागाडी शर्यतचे आयोजन करणे, राहुल चौगले या तरुणास जखमी करण्याच्या कारणावरून शर्यतीचे आयोजक जोतिबा तेलवेकर यांच्यावर मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.