Sat, May 25, 2019 22:35होमपेज › Kolhapur › कागल तालुक्यात गणवेशासाठी 61 लाखांचा निधी

कागल तालुक्यात गणवेशासाठी 61 लाखांचा निधी

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 12:01AMकागल : प्रतिनिधी

बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पुस्तके देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा लाभ कागल तालुक्यातील 10 हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

गणवेश खरेदी करण्यासाठी शाळा आणि विद्यार्थीनिहाय 61 लाख रुपयांचा निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गणवेश देणारे व्यापारी सध्या शाळेच्या दारोदारी फिरत आहेत. येत्या 15 ऑगस्टला सर्व विद्यार्थी नव्या कोर्‍या गणवेशातच तिरंगा झेंड्याला सलामी देणार आहेत.

शाळा सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीदेखील गणवेशाबाबतचा तिढा सुटत नव्हता. दोन गणवेशाची रक्कम गेल्या वर्षीपेक्षा 200 रुपयांनी यंदा वाढविण्यात आले. गेल्या वर्षी 400 रुपये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले होते. यंदा त्यामध्ये वाढ करून 600 रुपये करण्यात आले. आता ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर वर्ग करण्याऐवजी शाळा व्यवस्थापन 
समितीकडे वर्ग करण्याचा निर्णय उशिरा घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि विद्यार्थीनिहाय शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आल्या आहेत. आता व्यवस्थापन समिती शाळेच्या ड्रेसकोडनुसार व्यापार्‍याकडे गणवेशाची मागणी करीत आहेत. काही व्यापारी शाळेला भेट देऊन आपल्याकडे गणवेश घेण्याबाबत विनंती करीत आहेत. तर काही शाळांनी गणवेश खरेदी देखील केले आहेत. सर्व शाळांना येत्या 15 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश देऊन उपयोगिता प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.