होमपेज › Kolhapur › जरगनगर, टेंबलाई विद्यालयाला विजेतेपद 

जरगनगर, टेंबलाई विद्यालयाला विजेतेपद 

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 11:43PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आयोजित 68 व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत सुरू असणार्‍या कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात ल.कृ. जरग विद्यालय तर मुलींच्या गटात टेंबलाईवाडी विद्यालयाने बाजी मारली. 

छत्रपती शिवाजी स्टेडियमवर ही स्पर्धा झाली. उद्घाटन शिक्षण समिती सभापती सौ. वनिता देठे, पतसंस्था सभापती उत्तम गुरव, जगदिश ठोंबरे, सूर्यकांत ढाले, नीलेश सरनाईक आदी उपस्थित होते. संयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव व क्रीडाशिक्षकांनी केले. 

 मुलींच्या अंतिम सामन्यात टेंबलाईवाडी संघाने नेहरूनगर संघावर 30-14 अशी मात केली. विजयी संघात रोजी खान, आकांक्षा आंबी, अंजली कल्याणी, स्वाती गायकवाड, गायत्री देसाई, पल्लवी तुरुके, समृद्धी देसाई, शिवानी गडधरे, अंजली सफोनिशी, वैष्णवी माळगे यांचा समावेश आहे. सर्वांना प्रशिक्षक वंदना कमले व अशोक गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

मुलांच्या गटात जगरनगर विद्यालयाने ज्योतिर्लिंग विद्यामंदिरचा 19-5 असा पराभव केला. विजयी संघात मयुरेश मांडरेकर, दर्शील सोनुले, शुभम राठोड, शुभम टाकळे, यश तळेकर, अभिमन्यू कारंडे, हर्ष पौडकर, हर्षल पाटील, हर्ष लोट, सिद्धेश कुंभार यांचा समावेश आहे. सर्वांना प्रशिक्षक बाळासाहेब कांबळे, राजाराम माने यांचे मार्गदर्शन लाभले.