होमपेज › Kolhapur › गरीब विद्यार्थाचे शिक्षण बंद पडू देणार नाही : हजारो विद्यार्थानी घेतली शपथ (व्हिडिओ)

गरीब विद्यार्थाचे शिक्षण बंद पडू देणार नाही : हजारो विद्यार्थानी घेतली शपथ (व्हिडिओ)

Published On: Feb 03 2018 11:18AM | Last Updated: Feb 03 2018 1:42PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने आज (शनिवार) दसरा चौकात हजारो विद्यार्थानी गरीब विद्यार्थाचे शिक्षण बंद पडू देणार नाही, शिक्षणाचे खाजगीकरण होवू देणार नाही यांची शपथ घेतली. तर काही विद्यार्थीनीनी यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले.

आज (शनिवार) सकाळी दसरा चौक येथे हजारो शालेय विद्यार्थी शासनाच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात एकवटले.  यावेळी विद्यार्थ्यानी गरिबांचे शिक्षण बंद पडू देणार नाही, शिक्षणाचे खाजगीकरण होवू देणार नाही यांची शपथ घेतली. तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून शाळा वाचवण्याची मागणी केली.