Fri, Apr 26, 2019 03:40होमपेज › Kolhapur › मानाचे चार जग सौंदत्तीस रवाना

मानाचे चार जग सौंदत्तीस रवाना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘उदं गं आई उदं’च्या जयघोष आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फुलांची उधळण करत जोग-जोगतीणींचा मेळा, भाविक भक्‍तांसह श्री रेणुका देवीचे कोल्हापुरातील मानाचे चार जग रविवारी सायंकाळी सौंदत्तीकडे रवाना झाले. यावेळी करवीर नगरीचे महापौर, उपमहापौर यांच्यासह नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

दुपारी बाराच्या सुमारास बेलबाग येथील शिवाजीराव आळवेकर-मामा यांच्या जगाची पूजा किरण महादेव सावंत यांनी केली. त्यानंतर महापौर सौ. हसिना फरास व उपमहापौर अर्जुन माने, आदिल फरास यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी अच्युतराव साळोखे, माजी नगरसेवक परीक्षित पन्हाळकर, सुजय पोतदार, दीपक जाधव, अभिजित शिंदे, जगाचे मालक अमृत आळवेकर, प्रताप घोरपडे यांच्यासह आरती भंडारे, गजू गुंडाळे आदी उपस्थित होते. मंगळवार पेठेतील सोनाबाईआई बायजाबाई जाधव, रविवार पेठेतील बायाक्‍काबाई चव्हाण यांचा जग आणि गंगावेश परिसरातील लक्ष्मीबाई जाधव यांचे जग दुपारी चारच्या सुमारास बिंदू चौकात एकत्र आले. या ठिकाणी विधीवत पूजा झाली. तेथे तीन भक्‍तांनी हे जग डोक्यावर घेऊन ‘उदं गं आई उदं’ च्या गजरात, वाद्यांच्या निनादात, भाविकांच्या लवाजम्यासह मार्गस्थ झाले. कॉमर्स कॉलेज, उमा टॉकिज मार्गे पार्वती टॉकिज चौकात गेले. या ठिकाणी थांबून तेथून एसटीच्या बसने सौंदत्तीकडे रवाना झाले. यावेळी विराज शेंडे, प्रशांत शेंडे, दत्ता पवार, रोहित शेंडे, विजय चौगुले, राजू चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. कोल्हापुरात 28 व 29 रोजी कोल्हापुरात भाविक सौंदत्तीकडे रवाना होणार आहेत.