Wed, Jun 26, 2019 17:38होमपेज › Kolhapur › ‘भेटवस्तू’ मिळाल्यानेच काहींचा भाजपामध्ये प्रवेश : सतेज पाटील

‘भेटवस्तू’ मिळाल्यानेच काहींचा भाजपामध्ये प्रवेश : सतेज पाटील

Published On: Jul 01 2018 4:51PM | Last Updated: Jul 01 2018 4:51PMमिरज : प्रतिनिधी

भेटवस्तू आणि निवडणुकीसाठी फंड मिळाल्याने काहीनी भाजपात प्रवेश केला आहे. पालकमंत्री भेटवस्तू वाटा असे सांगतात त्यावरूनच भेटवस्तू घेण्यासाठी काही जण भाजपात गेले आहेत. जे भाजपात गेलेत त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल. त्यांचे अस्तित्व सुध्दा राहणार नाही असे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सक्षम उमेदवार नसल्याने पैसे देऊन आयते उमेदवार मिळवून निवडणूक लढविण्याची वेळ भाजप वर आली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड मधील मतदार काँग्रेसच्या पाठीशी खंबीर असून मनपा निवडणूक काँग्रेसच जिंकेल.

पदे उपभोगता आणि निधी दिला नाही म्हणून सांगता, त्यावेळी काय झोपा काढत होता काय ?

भाजपात गेलेले काँग्रेसमध्ये विकासकामासाठी निधी मिळत नव्हता असे सांगत आहेत पण, पदावर तुम्हीच होता. पदे उपभोगता आणि विकासकामांना निधी नव्हता असे सांगता. मग त्यावेळी काय तुम्ही झोपा काढत होता काय असाही सवाल सतेज पाटील यांनी भाजपात गेलेल्यांना केला.

आघाडीबाबत दोन दिवसांत निर्णय

मनपा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी बाबत चर्च्या सुरू असून उमेदवार व स्थानिक नेते यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ असे आ. सतेज पाटील यांनी सांगितले.