Mon, May 27, 2019 00:38होमपेज › Kolhapur › सचिन जामदारकडून शिवाजी पाटील चितपट

सचिन जामदारकडून शिवाजी पाटील चितपट

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:32PMदोनवडे : वार्ताहर

दोनवडे (ता. करवीर) येथे माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केदारनाथ कृषी विकास संस्थेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पै. सचिन जामदार (गंगावेश) व पै. शिवाजी पाटील (वारणा) यांच्यात अटीतटीची लढत झाली. दहाव्या मिनिटाला सचिनने पोकळ घिस्सा डावावर शिवाजीला अस्मान दाखवले व  पन्‍नास हजारांचे बक्षीस व चषक पटकावला. 

दुसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत सरदार सावंत (आमशी) याने शुभम पाटील (मोतीबाग) याला पाचव्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर चितपट केले. तिसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत बाबासो रानगे (वाशी) याने अमित कारंडे (सावर्डे दुमाला) याला दुहेरी हक्‍का डावावर चितपट केले. 

मैदानातील विजेते मल्ल  - शुभम पाटील (कोगे), किरण मोरे (कोगे), यश माने (वाकरे), गणेश कदम (दोनवडे), नितीन पवार (वाकरे), निखिल पाटील (दोनवडे), अनिल शेंडगे (कोपार्डे), विघ्नेश पाटील (मरळी), प्रतीक खताळ (कुंभी), सोमनाथ साळोखे (भामटे), प्रणव पाटील (आमशी), आदित्य फाटक (कोगे), महेश हराळे (खुपिरे), तुकाराम सातपुते (कोतोली), रविकिरण पाटील (पुनाळ), ओंकार मगदूम (भामटे), प्रथमेश गुरव (वाघुर्डे), श्रीधर चौगले (माळवाडी), नयन व्हरांबळे (वरणगे), प्रतीक तोडकर (वाकरे), दिगंबर पाटील (पासार्डे), ओंकार पाटील (कळंबा), ओंकार मांगोरे (कोगे), श्रीधर पाटील (गंगावेश), ज्ञानदेव कोंडेकर (नंदवाळ), सचिन बाबर (कुंभी), ओंकार पाटील (खाटांगळे), ओंकार मगदूम (भामटे), आदित्य माने (यवलूज), अतुल चेचर (पोर्ले), शुभम पाटील (खुपिरे), नवनाथ गोटम (तांदूळवाडी), संदीप जामदार (कोपार्डे), सोहेल मुल्लाणी (कोगे), ऋषिकेश पाटील (कुडित्रे), शाहरूख मुल्लाणी (कोगे), स्वप्निल हरणे (कुडित्रे), सुनील पाटील (कोगे), सागर कासोटे (सांगरूळ), सिद्धार्थ खाडे (सांंगरूळ), ओंकार पाटील (महे).

बक्षीस वितरण गोकुळचे संचालक बाळासो खाडे, उपसभापती विजय भोसले, राजू सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच संदीप लोहार, आबासाहेब शिंदे, बाळासो पाटील, पै. अशोक माने,  नगरसेवक राहुल माने, यशवंत बँक संचालक सरदार पाटील, उपस्थित होते. मैदानाचे संयोजन पी. एन. पाटील युवा मंच, हनुमान तालीम, महादेव तालीम व महादेव तरुण मंडळ यांनी केलेे.  निवेदन  यशवंत पाटील यांनी केले.