Thu, Jun 27, 2019 14:12होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील दोनशे शिक्षकांना स्मार्ट शिक्षणाचे दर्शन

जिल्ह्यातील दोनशे शिक्षकांना स्मार्ट शिक्षणाचे दर्शन

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 11:09PM

बुकमार्क करा
सावर्डे : वार्ताहर

कोल्हापूरसह कोकण विभागातील प्राथमिक शिक्षकांना नवनवीन शैक्षणिक उपक्रमांची माहिती मिळावी, यासाठी रत्नागिरी येथे भरवण्यात आलेल्या ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिळून सुमारे 200 जणांनी सहभाग नोंदवला.  प्रगत शिक्षण, शैक्षणिक प्रगती यामध्ये एकही बालक मागे राहता कामा नये, यासाठी राज्याचा शिक्षण विभाग कार्यरत आहे. विभागवार राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमांची माहिती शिक्षकांना, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांना करून देण्यासाठी सध्या रत्नागिरी येथे ‘शिक्षणाची वारी’अंतर्गत शैक्षणिक साहित्यनिर्मितीचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

या प्रदर्शनासाठी जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून निवडक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांना या वारीचे दर्शन घडवून आणून चांगला पायंडा पाडला आहे. या वारीत शिक्षणमंत्री विनोद तावडे, शासनाचे अधिकारी यांच्याशी शिक्षकांना थेट संवाद साधता आला. डिजिटल शाळा, ई-लर्निंग, पारंपरिक व्यवसायाभिमुख शिक्षण, ग्रामीण, शहरी जीवनावर आधारित खेळ, गणित, शाळा उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.