Wed, Feb 19, 2020 08:39होमपेज › Kolhapur › जयसिंगपूर : सिद्धेश्वर मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी पळविल्या 

जयसिंगपूर : सिद्धेश्वर मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी पळविल्या 

Published On: Dec 02 2017 4:09PM | Last Updated: Dec 02 2017 4:09PM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातील दोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या. या घटनेत सुमारे एक लाख साठ  हजाराची रोकड चोरट्यांनी पळवून नेली आहे. याबाबत मंदिराचे पुजारी दिलीप बाळय्या जंगम यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

 मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजा लगत असणाऱ्या खिडक्यांच्या काचा फोडून आत  हात घालून चोरट्याने आतील कडी काढून  आत प्रवेश केला आहे. ३ पैकी दोन पेट्या चोरट्यांनी लंपास केल्या.

पुजारी जंगम हे दररोज पहाटे साडे पाच वाजता मंदिर उघडतात व रात्री १० वाजता बंद करतात. आज पहाटे मंदिर उघडल्यानंतर जंगम यांना चोरीची कल्पना आली. त्यांनी तात्काळ सचिव सचिन कानवडे यांना घटनेची माहिती दिली त्यानंतर सर्व ट्रस्टी व ग्रामस्थ जमले. मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार व कलशारोहन, शिवलिंग प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला होता. त्यामुळे या दानपेटीत मोठी रक्कम होती. पाळत ठेऊन चोरट्याने चोरी केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.