Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : जैन मंदिराच्या कार्यालयात चोरी

कोल्हापूर : जैन मंदिराच्या कार्यालयात चोरी

Published On: Mar 14 2018 3:30PM | Last Updated: Mar 14 2018 4:26PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

शहरातील स्टेशन रोडवरील वर्दळीच्या ठिकाणी तिसऱ्या गल्लीत असलेल्या जैन श्वेतांबर मंदिराच्या मूर्तीपूजकांचे कार्यालय फोडले. चोरट्यानी कार्यालयातील दोन लोखंडी कपाट फोडली. सात महिन्यांपूर्वी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी पळविल्या होत्या. त्यामुळे शहरातील मंदिरेच चोरांचे टार्गेट असल्याचे दिसत आहे. 

मूर्तीपूजकांच्या कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कटावणीने उचकटून चोरटय़ाने आत प्रवेश केला. हॉलमधील लोखंडी कपाट फोडून साहित्य विस्कटले. तसेच हॉलच्या लगत असलेल्या पूर्व बाजूकडील खोलीतील जाडजूड लोखंडी लॉकर फोडून चोरट्याने रोकड, सोन्याचांदीचे दागिने यावर डल्ला मारला. मध्यरात्री सव्वा दोन ते तीनच्या सुमारास ही चोरी झाली.

 चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर सकाळी सहा वाजता जयसिंगपूर पोलिस, कोल्हापूर व इचलकरंजी गुन्हा अन्वेषण पथक, ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास श्वान  स्टॅली याने स्टेशन रोड ते थेट रेल्वेस्टेशन, लगतच्या उदगाव रोडने ते पुन्हा रेल्वेस्टेशन असा मार्ग दाखवला. ठसे तज्ञानी चोरटय़ांनी हाताळलेल्या वस्तूंवरील ठसे घेतले.

जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम, सांगली विभागाचे गुंडांविरुद्ध पथक प्रमुख  पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल होते.