Mon, May 20, 2019 22:05होमपेज › Kolhapur › रखवालदाराची 12 बोअरची बंदूक, काडतुसे लंपास

रखवालदाराची 12 बोअरची बंदूक, काडतुसे लंपास

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 12 2018 12:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी

खासगी बँकेतील रखवालदार पांडुरंग गोविंद पालकर (वय 58, रा. कळंबा, ता. करवीर) यांची खोली फोडून चोरट्याने पंधरा हजार रुपये किमतीच्या बारा बोअरच्या बंदुकीसह काडतूस, रंगीत दूरदर्शन संच चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली. अनोळखी चोरट्याविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लष्करातील निवृत्त जवान पालकर हे मुळचे भुदरगड तालुक्यातील नागणवाडी येथील रहिवासी आहेत. कळंब्यातील दत्तनगर (जनाईनगर) येथील दत्तात्रय निकम यांच्या घरात भाड्याने राहतात. पालकर व त्यांची मुलगी घराला कुलूप लावून परगावी गेले होते. या काळात चोरट्याने बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून प्रवेश केला. घरातील बारा बोअरची बंदूक, सहा जिवंत काडतुसे, रंगीत दूरदर्शन संच लंपास केला.

या घटनेची पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दखल घेऊन रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत, करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव आदी उपस्थित होते.