Wed, Nov 21, 2018 21:26होमपेज › Kolhapur › वाहनाच्या धडकेत तरुण ठार

वाहनाच्या धडकेत तरुण ठार

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 12:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बहिणीच्या लग्नाची कपडे खरेदी करून गांधीनगरहून हेरलेकडे निघालेला तरुण अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाला. ही दुर्घटना कोल्हापूर-सांगली मार्गावर शिरोली टोल नाका येथे शनिवारी घडली. अभिजित दिलीप बलवान (वय 26,  रा. हेरले) असे त्याचे नाव आहे.

अभिजित बलवान दुचाकीवरून गांधीनगरला कपडे खरेदीसाठी गेला होता. परत येताना टोलनाक्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत अभिजित रस्ता दुभाजकावर जोरात आदळला. त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अभिजित हा एका ब्लड बँकेत नोकरी करीत होता. अभिजितचे आई-वडील चहाची गाडी चालवून आपला चरितार्थ चालवितात. त्याच्या अपघाती निधनाने बलवान कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या बहिणीचे सोमवारी लग्न आहे.