Fri, Apr 26, 2019 17:54होमपेज › Kolhapur › सोनगेत नदी घाटाची 27 वर्षे प्रतीक्षाच !

सोनगेत नदी घाटाची 27 वर्षे प्रतीक्षाच !

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:52PMबानगे : रमेश पाटील

सोनगे (ता. कागल) येथील गावच्या उत्तरेस वेदगंगा नदी असून सध्या या नदीला दुथडी भरून पाणी वाहत आहे. 1990 साली दिवंगत खासदार उदयसिंह गायकवाड यांच्याकडे चौंडेश्‍वरी मंदिर ते वेदगां नदी पर्यंतच्या रस्त्याच्या खडीकरणाचा प्रस्ताव व घाट बांधणीचा प्रस्ताव संबंधीत खात्याकडे पाठवला होता तेंव्हा पासून हा प्रस्ताव प्रलंबीत होता. येथील महिलांची नदीघाटाअभावी गैरसोय झाली आहे. त्यामुळे महिला 25 वर्षे नदीघाटाच्या प्रतिक्षेत आहेत. तरी नदीघाट त्वरीत व्हावा. अशी मागणी येथील महिलांनी केली आहे. 

सद्या वीज वितरण कंपनीने भारनियमनाचा कालावधी वाढवला असल्याने त्याचा फटका गावातील नळपाणी पुरवठा करणार्‍या विद्युत पंपांनाही बसत असल्याने महिलांना पुरेशे पाणी मिळत नाही. शिवाय गावामध्ये आठवड्यातून प्रत्येक सोमवारी नळांना पाणी येत असल्याने महिलांना नदीवरती कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे. नदीकिनारी पुरातून वाहून आलेला गाळ मोठ्या प्रमाणात साचल्याने, साचलेल्या गाळातूनच महिलांना कपडे धुवावी लागतात. शिवाय वेदगंगा नदीपात्र खोल असल्याने दरडीवरून महिला पाण्यात पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कपडे धुणे हे धोकादायकच आहे. त्यामुळे हा प्रश्‍न त्वरीत मार्गी लागणे गरजेचे आहे.

जागतिक महिला दिनादिवशी पुन्हा मागणी करणार : संगीता शिंत्रे

नदीघाट बांधणे हा महिलांचा ज्वलंत प्रश्‍न असून येत्या 8 तारखेला जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा आयोजित करून नदीघाट बांधण्याचा ठराव करून पुन्हा प्रस्ताव पाठवून मागणी करणार अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्या व कामधेनू महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगिता बाबासाहेब शिंत्रे यांनी दिला.